¡Sorpréndeme!

जेष्ट कलाकार शशी कपूर यांना पाकिस्तानातही श्रद्धांजली | Bollywood Latest News

2021-09-13 6,572 Dailymotion

कलेला आणि कलाकाराला कोणत्याही धर्माचे बंधन नसते, ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झालीय. ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्या निधनानंतर त्यांना केवळ भारतातच नव्हे, तर पाकिस्तानातही श्रद्धांजली वाहण्यात आली. पेशावरमधील त्यांच्या वडिलोपार्जित घराबाहेर मेणबत्या पेटवून पाकिस्तानमधील चाहत्यांनी आंदराजली वाहिली.
पेशावरमधील खैबर-पख्तुनख्वा प्रांतामधील धोकी नालबंदी या गावात शशी कपूर यांची वडिलोपार्जित हवेली आहे. त्यांचे आजोबा दीवान बाशेश्वरनाथ सिंह कपूर यांनी २०व्या शतकाच्या सुरुवातीला ही हवेली बांधली होती. याचा हवेलीच्या आवारात खैबर-पख्तुनख्वा कल्चरल हेरिटेज काउन्सिल आणि पाकिस्तानमधील हिंदी सिनेमाच्या चाहत्यांनी मिळून शशी कपूर यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews